वास्तूनुसार स्वयंपाकघराचे स्थान: सर्व १६ दिशा

तुमच्या घरातील स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असेल, तर त्याचा परिणाम थेट आरोग्य, पैसा आणि घरातील शांततेवर होऊ शकतो…!

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेची ऊर्जा वेगळी असते आणि स्वयंपाकघरासाठी योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

आग्नेय दिशा का सर्वोत्तम मानली जाते?
ईशान्य दिशेत किचन का टाळावे?
आणि १६ दिशांपैकी कोणती दिशा शुभ, मध्यम किंवा अशुभ आहे?

चला जाणून घेऊया वास्तूनुसार स्वयंपाकघराचे योग्य स्थान!

1. उत्तर दिशा

उत्तर दिशेत स्वयंपाकघर टाळावे.
अग्नी-जल संघर्ष होऊन आरोग्य व आर्थिक नुकसान होऊ शकते.

2. उत्तर-ईशान्य दिशा

ही जलतत्त्वाची दिशा आहे – आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

3. ईशान्य दिशा

सर्वात पवित्र कोन – देवस्थानासाठी योग्य. येथे स्वयंपाकघर ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते.

4. पूर्व-ईशान्य दिशा

मध्यम, मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो.

5. पूर्व दिशा

सूर्याची ऊर्जा लाभदायक – चांगले आरोग्य देते.
स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे ठेवणे उत्तम.

6. पूर्व-आग्नेय दिशा

शुभ, आग्नेय (SE) प्रमाणे गुणधर्म – ऊर्जा व पचनशक्ती सुधारते.

7. आग्नेय दिशा

सर्वोत्तम, अग्नीचा कोन – स्वयंपाकघरासाठी आदर्श दिशा.
समृद्धी, ऊर्जा आणि उत्तम आरोग्य देते.

8. दक्षिण-आग्नेय दिशा

शुभ, आग्नेय दिशेचा विस्तार – सकारात्मक ऊर्जा वाढवतो.

9. दक्षिण दिशा

मध्यम, स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे ठेवू नये, अन्यथा घरात कलह वाढू शकतो.

10. दक्षिण-नैऋत्य दिशा

मध्यम, स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे ठेवू नये, अन्यथा घरात कलह वाढू शकतो.

11. नैऋत्य दिशा

स्थिरतेची दिशा, पण स्वयंपाकघरासाठी योग्य नाही.
घरगुती वाद, वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात. (राहूचा प्रभाव)

12. पश्चिम-नैऋत्य दिशा

अशुभ. शिक्षण व बचतीवर नकारात्मक परिणाम.

13. पश्चिम दिशा

शुभ. लाभ आणि परिपक्वतेची दिशा. योग्य वेंटिलेशन व दिशा लक्षात घ्यावी.

14. पश्चिम-वायव्य दिशा

मध्यम. स्वयंपाक करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे ठेवावे.
वायुवीजन आवश्यक.

15. वायव्य दिशा

खूप चांगली दिशा, वायुतत्त्वाचा कोन – शांतता, सामाजिक संबंध आणि पाहुण्यांसाठी शुभ.

16. उत्तर-वायव्य दिशा

मध्यम. आकर्षण आणि सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो.
काळजीपूर्वक वापर करावा.

 

OM Vasstu हे घर, फ्लॅट, बंगला, ऑफिस, दुकान आणि व्यावसायिक जागांसाठी तज्ज्ञ वास्तु सल्लामसलत प्रदान करणारे केंद्र आहे. वास्तुशास्त्राच्या तत्त्वांनुसार जागेचे विश्लेषण करून सकारात्मक ऊर्जा, आर्थिक प्रगती, आरोग्य आणि कौटुंबिक सौहार्द वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी ,आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता. 

> Residential Vastu

> Commercial Vastu

>  Industrial Vastu

> Plot Selection

> Online Consultation

 धन्यवाद ,                                                                 श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                       Civil Engineer /                                                       Diploma in Vastushashtra                                         +91 91366 38039  /  9819467974                           www.omvasstu.com

 
Scroll to Top